हिंसाचार करणाऱ्या शेतकऱ्यांवर कमेंट केल्याने कंगनाची सहा जाहिरातींमधून झाली छुट्टी

kangana ranaut comment on farmers

केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आंदोलन करीत आहेत. 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या (January 26, Republic Day) दिवशी या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिल्लीला कूच करीत ट्रॅक्टर रॅली काढली. पोलिसांनी ट्रॅक्टर रॅलीला परवानगी दिली होती आणि मार्गही आखून दिला होता. मात्र रॅली काढताना आंदोलनकर्ते बॅरिकेड तोडून लाल किल्ल्याकडे गेले आणि तेथे धुडगूस घातला. यावरून कंगनाने टीका केली. मात्र या टीकेमुळे कंगनाला (Kangana Ranaut) मोठे नुकसान सोसावे लागले आहे. एक-दोन नव्हे तर चक्क सहा कंपन्यांनी कंगनाला त्यांच्या जाहिरातींमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कंगनाने यावरून पुन्हा एकदा बॉलिवूड आणि तिला जाहिरातीतून काढून टाकणाऱ्या कंपन्यांवर तोंडसुख घेतले आहे.

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणानंतर (Sushant Singh death case) सगळ्यात जास्त अॅक्टिव्ह जर कोण झाले असेल तर ती आहे कंगना रनौत. बॉलिवूडसह शिवसेनेलाही तिने अंगावर घेतले होते. त्यामुळे मुंबई मनपाने तिच्या घरावर कारवाई करीत ते तोडलेही होते. तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनावरून दलजीत दोसांज आणि अन्य काही कलाकारांबरोबर तिचा वादही झाला होता. मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत शेतकरी मोर्च्यात झालेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना कंगनाने हिंसक आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर टीका केली होती.

या टीकेनंतर सहा मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या ब्रॅन्डसाठी ब्रॅन्ड अॅम्बेसेडर म्हणून साईन केले असतानाही ते कॉन्ट्रॅक्ट रद्द केल्याची माहिती स्वतः कंगनानेच सोशल मीडियावर दिली आहे. कंगनाने म्हटले आहे, ‘सहा कंपन्यांनी माझ्यासोबत केलेले कॉन्ट्रँक्ट रद्द केले आहे. काही कॉन्ट्रॅक्ट मी अगोदरच साइन केले होते. शेतकऱ्यांना मी आतंकवादी म्हटल्याने माझ्यासोबतचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात येत असल्याचे मला सांगण्यात आले. कंगनाने यासोबतच आणखी एक ट्वि़ट करीत त्यात बॉलिवुडवर नेम साधला आहे. या ट्विटमध्ये कंगना म्हणते, ‘देशातील प्रत्येक भारतियाला मी सांगू इच्छिते की, दिल्लीत झालेल्या दंग्याचे जे समर्थन करीत आहेत तेसुद्धा दहशतवादीच आहेत. यात राष्ट्रीय ब्रॅन्डचाही समावेश आहे. यासोबतच कंगनाने पुन्हा एकदा दलजीत दोसांजला टॅग करीत त्याच्यावर टीका करताना म्हटले आहे की, ‘हेच तुला हवे होते. ही तुझ्या चेहऱ्यावर चपराक नाही. कारण जे तुला हवे होते तेच घडले आहे. बॉलिवूडमध्ये पसरलेली घाण साफ करण्याची आता आवश्यकता आहे. मनोरंजनाच्या आडून दहशतवाद आणि हिंसा भडकावणाऱ्यांना तुरुंगात टाकले पाहिजे. ही वाळवी देशाला पोखरून काढत आहे असेही कंगनाने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER