मुंबईतून जाता जाता कंगना राणौतचा शिवसेनेला टोला

Kangana Ranaut Tweet on Shiv Sena

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. या वक्तव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे. कंगनाच्या अनधिकृत कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केली होती. त्यानंतर आपल्या कार्यालयात झालेलं नुकसान पाहण्यासाठी मुंबईत आलेली कंगना आता चार दिवसानंतर पुन्हा एकदा आपल्या गावी मनाली येथे जात आहे. लक्षवेधी बाब म्हणजे मुंबई (Mumbai) सोडताना कंगनाने पुन्हा एकदा शिवसेनेला टोला लगावला आहे .

“मी जड मनाने मुंबईतून जात आहे. गेल्या काही दिवसांत मला प्रचंड त्रास दिला गेला. माझ्यावर हल्ला झाला. खोटे आरोप केले गेले. माझं कार्यालय तोडले . माझं घर तोडण्याची धमकी दिली गेली. सुरक्षारक्षक हत्यारं घेऊन माझं संरक्षण करतायत. मला वाटतंय पाकिस्तानशी तुलना करणं योग्यचं होते.” मुंबई सोडताना कंगनाने अशा आशयाचे ट्विट केले आहे.

जेव्हा रक्षकच हे भक्षक झाल्याचे दाखवत आहे, त्यामुळे तेच लोकशाहीचे चीरहरण करत आहे. मला कमजोर समजून त्यांनी मोठी चूक केली आहे, असा पलटवार कंगनाने सेनेवर केला आहे. तसेच, त्यांना वाटले मी एक महिला आहे. घाबरून जाईन. पण मला भीती घालवून त्यांनीच आपली प्रतिमा धुळीस मिळवली आहे, अशी टीकाही कंगनाने शिवसेनेवर केली .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER