फडणवीस मुख्यमंत्री असते तर, नागरिकांना न्यायासाठी संघर्ष करावा लागला नसता – कंगना रनौत

Devendra Fadnavis-Kangana Ranaut-CM Uddhav Thackeray.jpg

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यानं काही महिन्यांपूर्वीच मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या करुन जीवन संपवलं. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. आणि या प्रकरणाचा तपास सीबीआय आणि एनसीबीकडून सुरू आहे. या प्रकरणात अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) काही गौप्यस्फोटही केले आहे. तसेच शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावरही गंभीर आरोप केले.

महाराष्ट्रातील सरकार बॉलिवूडमधील ड्रग्ज माफियांना पाठिशी घालत असल्याचं म्हणत मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी करणारी कंगना आता थेट ठाकरे सरकारवर निशाणा साधताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्याच्या घडीला मुख्यमंत्रीपदाची धुरा असती तर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य मार्गानं झाला असता असा दावा कंगनाने ट्विच्या माध्यमातून केला आहे.

‘राज्यात सध्या सत्तेत असणाऱी भ्रष्ट सोनिया सेना जी माफियांना पाठिशी घालते, त्यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर मुंबई पोलिसांनी त्यांचं काम योग्य मार्गानं केलं असतं. नागरिक आणि जनतेला त्यांच्या न्यायासाठी संघर्ष करावा लागला नसता’, असं तिनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER