कंगना रानौतला उपरती : म्हणाली, ‘मुंबईला मी नेहमीच यशोदा मातेचा दर्जा दिला’

Kangana Ranaut Tweet

मुंबई : मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) कार्यप्रणालीवर शंका उपस्थित केल्यामुळं वादाच्या भोवऱ्यात सापडलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतला (Kangana Ranaut) अखेर उपरती आली आहे. तिचा सूर अखेर बदलला आहे. मुंबई (Mumbai) व महाराष्ट्राबद्दल (Maharashtra) कृतज्ञता व्यक्त करत तिनं अखेर जय मुंबई, जय महाराष्ट्र असा नारा दिला आहे. त्यामुळं आता हा वाद शमण्याची चिन्हे आहेत.

‘गुंड व माफियांपेक्षा मला मुंबईची जास्त भीती वाटते’ असं म्हणणारी व सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात मुंबई पोलिसांवर आरोप करणारी कंगना रानौत हिच्यावर राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून टीकेची झोड उठली होती. कंगनाला मुंबई पोलिसांची भीती वाटत असेल तर तिनं आपल्या राज्यात निघून जावं, असा इशारा शिवसेना, मनसेनं दिला होता. तर, कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, असं मत खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी व्यक्त केलं होतं.

प्रकरण आणखीनच चिघळण्याची शक्यता लक्षात घेता अखेर तिचा सूर अखेर बदलल्याचं दिसत आहे. तिनं आपल्या ट्वीटमध्ये तिनं पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. ती म्हणते, ‘महाराष्ट्रसह देशभरातील माझ्या सर्वच ठिकाणच्या मित्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझा हेतूबद्दल कोणालाही शंका नाही आणि माझी कर्मभूमी असलेल्या मुंबईबद्दलचं माझं प्रेम सिद्ध करण्याची गरज नाही. मला स्वीकारणाऱ्या मुंबईला मी नेहमीच यशोदा मातेचा दर्जा दिला आहे. जय मुंबई, जय महाराष्ट्र!’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER