… पण तरीही मला कंगनाने या खटल्यात पार्टी केल्याने धक्का बसला आहे; कंगना रणौत – संजय राऊत वाद पेटला

Kangana Ranaut-sanjay Raut.jpg

मुंबई : सुशांत सिंहच्या प्रकरणापासून (Sushant Singh case) सतत वादग्रस्त विधानाने चर्चेत आलेली अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यातील वाद आता पुन्हा पेटल्याचे दिसते आहे. मुंबई महापालिकेने कंगनाचे कार्यालय तोडल्यानंतर या प्रकरणात तिने खासदार संजय राऊत यांनाही दोषी धरले असून त्यांचेही नाव केसफाईल केले आहे.

यावरून संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राच्या बदनामीविरुद्ध लढलो म्हणून मला जर कुणी तुरुंगात टाकत असेल तर मी तुरुंगातही जायला तयार आहे, असा इशारा शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दिला. संजय राऊत म्हणाले, “मुंबई महापालिका ही स्वायत्त संस्था आहे.

कंगनाच्या कार्यालयावर कारवाई होते, हे मला माहीत नव्हतं. माहीत  असण्याचं कारणही नव्हतं. पण तरीही मला कंगनाने या खटल्यात पार्टी केल्याने आश्चर्य वाटलं असून धक्काही बसला आहे. मी न्यायालयाचा नेहमीच सन्मान करतो. त्यामुळे उद्या किंवा परवा या प्रकरणाबाबत मी कोर्टात माझं म्हणणं मांडणार आहे, असं सांगतानाच या प्रकाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली आहे. ” असं राऊत यांनी स्पष्ट केलं. ते टीव्ही-९ मराठीसोबत बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER