सात महिन्यांनंतर कंगना रणौत करणार ‘थलाइवी’चे शूटिंग

Thalavia

कंगना  रणौतही  तिच्या ‘थलाइवी’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी परत जात आहे आणि तिने ट्विटद्वारे ही बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे. कंगनाने लिहिले, “प्रिय मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे.””

कोरोना काळात चित्रपटांचे प्रदर्शन थांबले असताना दुसरीकडे कलाकारांचा उदरनिर्वाहही हिसकावला गेला. मोठ्या कलाकारांसाठी आयुष्य थोडे सोपे होते; परंतु तरुण कलाकारांना त्यांच्या घरी परत जाणे भाग पडले. तथापि, आता हळूहळू लहान आणि मोठे कलाकार पुन्हा एकदा कामावर परत येत आहेत. कंगना रणौतही शूटिंगसाठी परत जात आहे आणि तिने ट्विटद्वारे ही बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे. कंगनाने लिहिले, “प्रिय मित्रांनो, आजचा दिवस हा एक खास दिवस आहे. सात महिन्यांनंतर मी आज कामावर परत येत आहे.

माझा सर्वांत महत्त्वाकांक्षी द्विभाषिक प्रकल्प ‘थलाइवी’साठी मी दक्षिण भारताच्या दिशेने जात आहे. महामारीच्या या कठीण काळात आपल्या प्रार्थनेची आवश्यकता आहे. यासह कंगनाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यात कंगना खूप आनंदात दिसत आहे. कंगनाने फोटो शेअर केले आणि लिहिले की, “यापैकी फक्त काही सेल्फी सकाळी क्लिक केल्या. आशा आहे की आपणा सर्वांना आवडेल.”

‘थलाइवी’ या सिनेमात कंगना जयललितांची भूमिका साकारत असल्याची माहिती आहे. ट्रोल झाली होती कंगना या चित्रपटासाठी कंगनाने वजन खूप वाढवले होते. त्याचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते. मात्र, जेव्हा या चित्रपटाचा टीझर व्हिडीओ रिलीज झाला तेव्हा कंगनालाही ट्रोल केले गेले होते. कारण असे होते की, कंगनाच्या लूकसमवेत वापरण्यात आलेला ग्राफिक खूप वाईट दिसत होता आणि तिचा लूक स्पष्टपणे फेक दिसत होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER