कंगना रनौत परतली मुंबईला

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणानंतर (Sushant Singh death case) बॉलिवुडमधील अनेकांशी कंगनाने (Kangana Ranaut) जसा पंगा घेतला तसाच तिने तो शिवसेनेशीही घेतला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर तिने टीका केली होती. या टीकेमुळे मुंबई महापालिकेची (Mumbai Municipal Corporation) सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेने कंगनाचे ऑफिस अनधिकृत असल्याचे सांगत तोडून टाकले होते. याविरोधात कंगनाने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कंगनाला दिलासाही दिला होता. दुसरीकडे शिवसेनेने कंगनाविरोधात तक्रारही दाखल केली होती. त्या तक्रारीच्या चौकशीसाठी पोलिसांनी कंगनाला नोटिस बजावली होती. पण सुरुवातीला भावाचे लग्न आणि नंतर हैदराबादमध्ये सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी असल्याने कंगना मुंबईला पोलिसांकडे चौकशीसाठी येऊ शकली नव्हती. तिने पोलिसांकडे वेळही मागितली होती. सप्टेंबरमध्ये कंगना मुंबईला आली होती. त्यानंतर ती काल म्हणजे सोमवारी मुंबईला परतली.

एकीकडे मुंबईत शिवेसनेला अंगावर घेतले असताना शेतकरी आंदोलनावरून कंगनाने आंदोलनकर्त्यांवर टीका केली. एवढेच नव्हे तर तिने दिलजीत दोसांझसह अनेकांवर टीका केली होती. शेतकरी आंदोलनाच्या आडून काही शक्ती अशांती पसरवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे कंगनाने म्हटले होते.

काल कंगना तिची बहिण रंगोली आणि भाचा पृथ्वीराजसोबत मुंबईला परतली. शिवसेनेशी पंगा घेतलेला असल्याने केंद्र सरकारच्या गृह विभागाने कंगनाला वाय सिक्यूरिटी दिली आहे. त्यामुळे कंगनाभोवती सुरक्षेचे कडेही होते. कोरोना असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत कंगना एअरपोर्टवरून बाहेर पडताना दिसली. त्यातच कंगनाच्या घरावरील मनपा कारवाईबाबत कंगनाने केलेल्या याचिकेविरोधात काही दिवसांपूर्वीच दिवाणी न्यायालयाने निर्णय देत कंगनाची याचिका फेटाळून लावली आहे. या पार्श्वभूमीवर कंगना आता मुंबईला परतली असून तिचे आणि शिवसेनेचे सुरु असलेले युद्ध कोणते वळण घेते ते पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER