मनालीला जाताच कंगना १० दिवसांसाठी क्वारंटाईन

Kangana Ranaut - Quarantine

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्त्व्यांनंतर ५ दिवस मुंबईत (Mumbai) घालवले. त्यानंतर सोमवारी मुंबईतून हिमाचल प्रदेशमधील मनालीला (Manali) आपल्या घरी गेली आहे. मात्र, तेथे गेल्यानंतर तिला १० दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोनाचा (Corona) मोठा प्रादुर्भाव असलेल्या मंबईतून आल्याने हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून कंगनाला क्वारंटाईन केलं आहे. त्यामुळे आता कंगनाला पुढचे १० दिवस घराबाहेर पडता येणार नाही. तसेच कोणाची भेटही घेऊ शकणार नाही.

क्वारंटाईन काळातच कंगना रनौतची आठवडाभरानंतर पुन्हा एकदा कोव्हिड (COVID-19) चाचणी घेतली जाणार आहे. त्या चाचणीच्या अहवालावरच कंगनावरील निर्बंध शिथिल होणार की आणखी वाढणार हे निश्चित होणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये अद्यापही राज्य प्रवेश करण्यासाठी ई-पास सक्ती कायम आहे. तर महाराष्ट्रात अनलॉक दरम्यान टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल होत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER