कोट्यावधींची मालकीण आहे कंगना रनौत

Kangana Ranaut.jpg

कंगनाने 2006 मध्ये गँगस्टर चित्रपटाने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तिने आतापर्यंत 36-37 चित्रपट केले असतील. मात्र इतक्या कमी वेळात इतके कमी चित्रपट करूनही तिने कोट्यावधींची संपत्ती गोळा केली आहे. मुंबई महानगरपालिकेने तिचे जे ऑफिस तोडले त्याची किंमत 50 कोटी रुपयांचे असल्याचे सांगितले जाते. तीन वर्षांपूर्वी कंगनाने हे ऑफिस 20 कोटी रुपयांचा घेतल्याचे सांगितले जाते. त्यानंतर इंटीरियरवर कंगनाने कोट्यावधी रुपये खर्च केल्याने या जागेची किंमत 50 कोटींच्या आसपास गेली आहे.

गेल्या 14 वर्षात कंगनाने मुंबईत तीन फ्लॅट घेतले आहेत. खार येथील आर्केड ब्रिजच्या रोड नंबर 16 वरील एका इमारतीत हे फ्लॅट आहेत. कंगना या इमारतीच्या पाचव्या राहाते. येथेच तिचे तीन फ्लॅट आहेत. यापैकी एक फ्लॅट 797 चौरस फूट, दुसरा 711 चौरस फूट आणि तिसरा प्लॅट 459 चौरस फूट आहे. या तिन्ही फ्लॅटची एकत्रित किंमत 15 कोटींच्या आसपास आहे. याशिवाय कंगनाने मनालीत एक आलिशान बंगला बांधला असून त्याची किंमत 30 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. या बंगल्यात आठ रूम्स असून तिने 10 कोटी रुपयांना हा बंगला विकत घेतला होता आणि इंटीरियरवर 20 कोटी रुपये खर्च केले आहेत.

कंगनाकडे अजून सात- आठ चित्रपट असून यात धाकड, थलायवी, तेजस आणि इमली चित्रपटांचा समावेश आहे. प्रत्येक चित्रपटाचे बजेट 60 ते 70 कोटी रुपये असून तिच्या चित्रपटांवर एकूण 250 ते 300 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. मात्र शिवसेनेबरोबर पंगा घेतल्याने तिच्या या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या वेळी शिवसेना विरोध करणार हे नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER