आता कंगनाचे टार्गेट शरद पवार, म्हणाली पवारांच्या पार्टनरकडून खरेदी केला फ्लॅट

Sharad Pawar-Kangana Ranaut

मुंबई : मुंबई महापालिकेने (BMC) अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) कार्यालयावर अतिक्रमण विरोधी कारवाई केल्यानंतर ती अधिकच आक्रमक झाली आहे. कालपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला टार्गेट करणाऱ्या रानौतने आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना लक्ष्य केले आहे.

ही बातमी पण वाचा:- बाळासाहेबांची विचारधारा विकून शिवसेनेची ‘सोनिया सेना’ ;  कंगनाचा घणाघात 

हा फक्त माझाच नाही तर संपूर्ण इमारतीचा प्रश्न होता, केवळ माझ्या फ्लॅटचा इश्यू नाही. ज्यासाठी बांधकाम व्यावसायिकाने सामोरे जाण्याची गरज आहे. ही इमारत शरद पवारांची आहे. आम्ही हा फ्लॅट त्यांच्या पार्टनरकडून खरेदी केला आहे. म्हणूनच ते यासाठी उत्तरदायी आहेत, असं तिनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER