आज बीएमसीने माझ्या कार्यालयावर छापा टाकला, उद्या ते नोटिस न देताच संपूर्ण स्ट्रक्चर तोडतील – कंगना

BMC raided at kangana office

मुंबई: कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचा वाद चांगलाच चिघळला आहे. या वादात आता मुंबई महागर पालिकेनेही (BMC) हस्मातक्षेप केल्त्रयाचे दिसत आहे. मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी आज कंगनाच्या मुंबईतील ऑफीसमध्ये पाहणीसाठी गेले. त्यानंतर कंगनाने व्हीडिओ पोस्ट करत बीएससीवर भलतेच आरोप केले आहे.

बीएमसीचे काही अधिकारी आपल्या कार्यालयात जबरदस्तीने घुसले आणि ते उद्या हे कार्यालय तोडण्याच्या तयारीत आहेत, असा दावा कंगनाने केला आहे. ‘मुंबईतील हे मणिकर्णिका चित्रपटाचे कार्यालय आहे. हे कार्यालय मी पंधरा वर्ष मेहनत करून कमावले आहे. आयुष्यात माझे एकच स्वप्न होते, की जेव्हा मी चित्रपट निर्माता बनेन तेव्हा माझे स्वतःचे एक कार्यालय असेल. मात्र, हे स्वप्न भंगण्याची वेळ आली आहे, असे वाटते. आज तेथे अचानक बीएमसीचे लोक आले आहेत.’ असे कंगनाने ट्विट करत सांगितले आहे.

तर, दुस-या ट्विटमध्ये बीएमसीच्या अधिका-यांनी माझ्या कार्यालयातील सहका-यांना अरेरावी करत शिवीगाळ केल्याचा दावादेखील कंगनाने केला आहे.

हे लोक बीएमसीचे आहेत. जबरदस्तीने माझ्या कार्यालयात घुसले आहेत. त्यांनी माझ्या शेजाऱ्यांनाही त्रास दिला. जेव्हा माझ्या शेजाऱ्यांनी या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले तेव्हा, त्या ज्या मॅडम आहेत, त्यांच्या कृत्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील. मला उद्या सूचाना देण्यात येईल, की ते माझ्या प्रॉपर्टीची मोड-तोड करत असल्याचे कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

आणखी एका ट्विटमध्ये कंगनाने म्हटले आहे की, माझ्या कार्यालयाची अशी न कळवता चौकशी करणे तसेच, ‘बेकायदेशीर बांधकामासंदर्भात नोटीशीसोबतच बीएमसीला स्ट्रक्चर प्लॅन पाठवणे आवश्यक आहे. आज त्यांनी माझ्या कार्यालयावर छापा टाकला आणि उद्या ते नोटिस न देताच संपूर्ण स्ट्रक्चर तोडतील’. असा आरोप कंगनाने केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER