कंगना रणौतने नुकसान भरपाई म्हणून मुंबई महापालिकेकडे मागितले दोन कोटी

Kangana Ranaut-BMC.jpg

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि शिवसेनेचा (Shivsena) वाद चांगलाच पेटला आहे. मुंबई महापालिकेने (BMC) तिच्या ऑफिसचं बांधकाम बेकायदेशीर तोडल्याचा आरोप करत महापालिकेकडून दोन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

बंगल्याच्या एकूण मालमत्तेपैकी ४० टक्के मालमत्तेचे नुकसान बीएमसीने केल्याचा कंगनाने दावा केला. यावर पुढच्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. आता जर बीएमसी कंगनाचं बांधकाम अनधिकृत नसल्याचं सिद्ध करू शकली नाही तर त्यांना कंगनाला नुकसान भरपाई म्हणून दोन कोटी रुपये द्यावे लागतील.

दरम्यान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. या वक्तव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER