पुलवामापेक्षा जास्त नागरिक तुम्ही भिवंडीत मारले; कंगनाचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Kangana Ranaut - Bhiwandi Building Collapsed - Uddhav Thackeray

मुंबई : भिवंडी शहरात सोमवारी (२१ सप्टेंबर) तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवरून बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केले आहे.

पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानने मारले नव्हते तितके निर्दोष लोक तुमच्या निष्काळजीपणामुळे मारले गेले, अशी टीका कंगनाने ट्विटरवरून उद्धव ठाकरेंवर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut), मुंबई महापालिका हे बेकायदेशीररीत्या जेव्हा माझ्या घराचं तोडकाम करत होते, त्यावेळी त्यांनी या इमारतीवर लक्ष दिले असते तर आज जवळपास ५० लोक जिवंत असते. इतके सैनिक पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानने मारले नव्हते तितके निर्दोष लोक तुमच्या निष्काळजीपणामुळे मारले गेले. मुंबईचं काय होणार हे देवाला माहिती, असे ट्विट कंगना रणौतने केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER