शिवसेनेची सोनिया सेना झाली आणि … – मुंबईतील दहशतवादावर कंगनाचा टोमणा

Kangana Ranaut.jpg

नवी दिल्ली : शिवसेनेच्या धमक्यांना तशाच भाषेत उत्तर देणारी अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) चंदीगडला पोहचली आणि पुन्हा शिवसेनेला (Shivsena) टोमणा मारला – शिवसेनेची सोनिया सेना होताच मुंबईत दहशतमाजवणाऱ्या प्रशासनाचाच बोलबाला आहे.

कंगनाने ट्विट केले – “चंदीगडमध्ये उतरताच माझी सुरक्षा नाममात्र राहिली आहे. लोक आनंदाने अभिनंदन करत आहेत. असे वाटते, यावेळी मी वाचले. एक दिवस होता, जेव्हा मुंबईत आईच्या कुशीतली उबदारता जाणवत होती. आज असा दिवस आहे, जीव वाचला म्हणजे लाखो मिळवले. शिवसेनेची सोनिया सेना होताच मुंबईत दहशतमाजवणाऱ्या प्रशासनाचाच बोल बाला आहे.

याशिवाय कंगनाने आणखी एक ट्विट केले – दिल्लीचे हृदय चिरून यावर्षी तेथे रक्त सांडले, सोनिया सेनेने मुंबईत आझाद काश्मीरच्या घोषणा दिल्या. आज स्वातंत्र्याची किंमत केवळ आवाज आहे. मला आपला आवाज द्या. अन्यथा भविष्यात स्वातंत्र्याची किंमत केवळ आणि केवळ रक्तच असेल.

मुंबईतून निघतानाही कंगनाने ट्विट केले होते – जब रक्षक ही भक्षक होने का एलान कर रहे हैं. धडियाल बन लोकतंत्र का चीरहरण कर रहे हैं, मुझे कमजोर समझ कर, बहुत बडी भूल कर रहे हैं! एक महिला को डरा कर उसे नीचा दिखाकर, अपनी इमेज को धूल कर रहे हैं!!

या शेरोशायरीतून कंगनाने, महाराष्ट्र सरकारवर लोकशाहीचे वस्त्रहरण केल्याचा आरोप केला. मला कमकुवत समजण्याची मोठी चूक केली. एका महिलेला घाबरवत तिच्यावर अन्याय करत स्वत:ची प्रतिमा मलीन करत असल्याचेही म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER