राज्य सरकारचा आतंक आणि अत्याचार वाढतोय; केंद्राने हस्तक्षेप करावा- कंगना रणौत

Kangana Ranaut-Uddhav Thackeray-PM Modi

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) कार्टून फॉरवर्ड केल्याने शिवसैनिकांकडून (Shivsena) नौदलाच्या (Kangana Ranaut) माजी अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना काल कांदिवली येथे घडली. यावरून आता अभिनेत्री कंगना रणौत हिने पुन्हा एकदा ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे.

कंगनाने एक व्हिडीओ शेअर करत राज्य सरकारचा आतंक आणि अत्याचार वाढत असल्याचे म्हटले आहे. ‘महाराष्ट्र सरकारचा आतंक आणि अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्र सरकारने दिवसाढवळ्या निवृत्त अधिकाऱ्यावर हल्ला केला. त्यांची चुकी एवढीच होती की, त्यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली. त्यामुळे आता केंद्र सरकारने मध्यस्थी करत हस्तक्षेप करावा, अशी मागणीही तिने केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER