बाळासाहेबांची विचारधारा विकून शिवसेनेची ‘सोनिया सेना’ ; कंगनाचा घणाघात

Uddhav Thackeray-Kanagna Ranaut

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. या वक्त्यव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे . आता कंगनाने पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा विकून शिवसेनेची ‘सोनिया सेना’ (Sonia Sena) झाली आहे, अशी कडवट टीका तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली . याआधीही तिने मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत आव्हान दिले होते .

“श्री बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी ज्या विचारसरणीवर शिवसेना निर्माण केली, आज तीच विचारधारा सत्तेसाठी विकली आणि शिवसेनेची ‘सोनिया सेना’ झाली. ज्या गुंडांनी माझे घर माझ्या मागे फोडले, त्यांना नागरी संस्था म्हणू नका, संविधानाचा इतका मोठा अपमान करु नका” असे ट्वीट कंगनाने केले आहे.

याअगोदर टीका करत कंगना म्हणाली होती की, “उद्धव ठाकरे तुला काय वाटतं? तुम्ही फिल्म माफियासोबत माझं घरं तोडून फार मोठा सूड उगवलात. आज माझं घर मोडलं आहे, उद्या तुझा अहंकार मोडेल.” अशी एकेरी भाषा कंगनाने वापरली होती. “ही वेळेची किमया आहे, लक्षात ठेवा… प्रत्येक वेळी वेळेचं चक्र सारखंच राहत नाही. आता मला वाटतं की, तुम्ही माझ्यावर फार मोठे उपकार केले आहेत. कारण मला माहित होतं की काश्मिरी पंडितांवर काय बेतलं असेल, आज मी त्याचा अनुभव घेतला आहे , अशा शब्दात तिने शिवसेनेवर टीकास्त्र सोडले होते .

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER