मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रावणाची उपमा देत कंगना म्हणाली, धैर्याने पुढे जात राहीन

CM Uddhav Thackeray - Kangana Ranaut

मुंबई : मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) पाली हील भागातील ‘मणिकर्णिका’ कार्यालयावर कारवाई केल्यानंतर तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि शिवसेनाविरोधात (Shivsena ) ट्विटचा सपाटा लावला आहे. आज तिने मिम्स शेअर करत मराठीत ट्वीट केलं आहे. या ट्विटमध्ये तिने उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) थेट रावणाची उपमा दिली आहे.

मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह मिम्स शेअर करत कंगना रनौतनं आता मराठीत ट्वीट केलं आहे. कंगनानं एक चित्र शेअर केलंय. ज्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई दिसत आहेत. यात राणी लक्ष्मीबाईंच्या रुपात कंगना दिसत आहे. तर या चित्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रावणाची उपमा दिली आहे. त्यात त्यांना दहा तोंडं दाखवली असून मागे जेसीबी दाखवला आहे.

विशेष म्हणजे कंगनानं हा ट्वीट मराठीत केला आहे. यात ती म्हणते, ‘मला अनेक मिम्स मिळाले आहेत. हे मिम्स माझ्या मित्राने पाठवले आहे. लक्ष्मीबाई, वीर शिवाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझे कार्य पुढे करत राहीन. जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहीन, जय हिंद, जय महाराष्ट्र’.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER