कंगना रणौतचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह ; हिमाचल प्रदेशहून मुंबईकडे रवाना

Kangana Ranaut

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगणा राणावतने (Kangana Ranaut) शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करताना मुंबई (Mumbai) पाकव्याप्त काश्मीरसारखे वाटते, असे म्हटले होते . कंगणाच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेने तिचा चांगलाच समाचार घेतला . यावर मुंबई कुणाच्या बापाची नाही, 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे हिंमत असेल तर अडवून दाखवा , असे खुले आव्हान कंगनाने शिवसेनेला दिले आहे . यावरून चांगलेच वादंग पेटले आहे .

हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) असलेल्या कंगनाची कोरोना (Corona) चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर तिचा मुंबईत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहेगना सकाळी रस्त्याने मंडीहून चंदीगढला जात आहे. त्यानंतर ती विमानाने चंदीगडहून मुंबईला येईल. आज दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी तिची फ्लाईट आहे. दरम्यान याआधी कंगनाचे कोरोना चाचणीसाठीच्या सॅम्पलमध्ये काही त्रुटी निघाल्या होत्या. त्यामुळे पुन्हा तिचे कोरोना चाचणीसाठीचे नमुने घेण्यात आले.

दरम्यान शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी कंगनाला मुंबईत येऊन दाखवण्याचं आव्हान दिलं होतं. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी तर कंगना मुंबईत आल्यास शिवसेनेच्या रणरागिनी तिचं थोबाड फोडतील असा आक्रमक इशारा दिला होता. त्यामुळे आज नेमकं काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER