कंगना रानौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

Kangana Ranaut

मुंबई : आक्षेपाहार्य ट्विट केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) व तिची बहीण रंगोली चंडेल यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंगनावर गुन्हा नोंदविण्याचा आदेश वांद्रे न्यायालयाने दिल्यानंतर १२ तासांच्या आत पोलिसांनी दोघींविरोधात गुन्हा दाखल केला. कंगना व तिची बहीण रंगोली यांनी टिष्ट्वटरवर पोस्ट टाकून हिंदू व मुस्लीम समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कास्टिंग डायरेक्टर आणि फिटनेस ट्रेनर मुन्नावरली सय्यद (Munnavarli Syed)यांनी केला. बाबत वांद्रे दंडाधिकारी न्यायलयात त्यांनी तक्रार केली होती.

सुशांतने आत्महत्या केल्यानंतर कंगनाने ट्विट करून बॉलिवूडच्या घराणेशाहीवर टीका केली होती. तसेच याप्रकरणाचा तपास मुंबई पोलीस नीट करत नसल्याचा आरोप करून मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. तसेच त्यावरून शिवसेनेलाही लक्ष्य केले होते.

कंगनाविरोधात याचिका दाखल करणा-यांनी म्हटले होते की, ती बॉलीवूडमध्ये हिंदू-मुस्लिम समुदायमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मिडियाच्या माध्यमापासून ते टीव्हीवर सगळीकडे बॉलीवूडच्या विरोधात बोलत आहे.’कंगना रनौत तिच्या ट्विट्सच्या माध्यमातून दोन समुदायांमध्ये द्वेष निर्माण करण्याला प्रोत्साहन देत आहे. यामुळे केवळ धार्मिक भावनांना ठेच पोहोचत नाहीये तर इंडस्ट्रीतील कित्येक लोक दुखावले गेले आहेत. त्यामुळे कंगनावर जातीयवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप लावला गेला होता.

या प्रकरणी वांद्रे पोलिस स्टेशनने कंगनाच्या विरुद्ध हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी प्रकरणाचा तपास व्हावा यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. न्यायालयाने कंगनाविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. याचिकाकर्त्यांनी न्यायालयात कंगनाचे ट्विट्स सादर केले.त्यानुसार कंगना रानौत आणि तिची बहिण रंगोली चंडेल विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता १२४ नुसार देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही बातमी पण वाचा : राज्यपालांनी मुख्यमंत्री ठाकरेंबाबत केलेले वक्तव्य टाळायला पाहिजे होते – अमित शाह

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER