‘कंगनासारखे ‘उपरे’ आणि डिनो, गोमेझ, जॅकलिन, पटानी अस्सल मराठी!’ नितेश राणेंचा शिवसेनेला टोमणा

CM Uddhav Thackeray - Nitesh Rane

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana ranaut) मुंबईची (Mumbai) तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तिच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेने (Shiv Sena) सामना अग्रलेखातून कंगना रणौतवर टीकास्त्र सोडले आहे . यावर भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी या वादावरून शिवसेनेला पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. तसेच कंगनाला उपरी म्हणणाऱ्या शिवसेनेला टोला लगावला आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करून शिवसेनेवर निशाणा साधला . कंगनासारखे उपरे आणि डिनो, गोमेझ, जॅकलिन आणि पटानी अस्सल मराठी! हो ना?? असा चिमटा नितेश राणेंनी काढला आहे. तसेच टेंडर देताना आणि पार्ट्या करताना मराठी अस्मिता कुठे जाते? असा सवाल नितेश राणेंनी विचारला आहे.

दरम्यान मुंबईत खाऊन, ‘पिऊन’ तरारलेली एक महिला फिल्मी कलावंत मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या टाकते हे सहन करता येणार नाही आणि राज्याच्या विधिमंडळात या प्रकाराची निंदा करायलाच हवी, असे शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे . तसेच विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज अग्रलेखामधून कंगनाविरोधात पक्षभेद विसरून आवाज उठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावरून नितेश राणे यांनी ट्विट केले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER