कंगना ऑफिस तोडफोड प्रकरण ; संजय राऊत यांना उत्तर देण्यास कोर्टाने दिली मुदतवाढ

Kangana Ranaut - Bombay High Court - Sanjay Raut

मुंबई : कंगना रणौतने (Kangana Ranaut) मुंबईतील कार्यालय तोडल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे . या प्रकरणी कंगनाने दाखल केलेल्या याचिकेनंतर शिवसेना (Shivsena) खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) तसंच महापालिकेचे अधिकारी भाग्यवंत लोटे या दोघांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. या प्रकरणावर आज सुनावणी सुरु असतान या दोघांनीही उत्तर देण्यासाठी मुदतवाढ मागितली. ज्यानंतर कोर्टानं या दोघांना मुदतवाढ दिली आहे.मात्र न्यायालयाने पालिकेला फाटकारलेही आहे .

कंगनाने दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी मुदत मिळावी, अशी विनंती महापालिकेनं हायकोर्टात केली असता, तुम्ही वेळ मागता पण कारवाई मात्र लगेच करता, अशा शब्दांत मुंबई हायकोर्टाने मुंबई महापालिकेचे कान टोचले आहे. दरम्यान, कंगना रणौतच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेनं काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती. महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयाच्या तळमजल्यावरील 12 अनधिकृत बांधकाम जेसीबी आणि बुलडोझरच्या सहाय्यानं कारवाई केली होती. कंगना रणौतने काही दिवसांपूर्वी मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसाखी वाटते अशी प्रतिक्रिया दिली होती. यानंतर शिवसेना आणि कंगनामध्ये चांगलाच वाद निर्माण झाला आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER