कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही – गृहमंत्री अनिल देशमुख

kangana ranaut & Anil Deshmukh

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेनंतर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगना रणौतबाबत मोठे वक्तव्य केले आहे. कंगना रणौतने मुंबईत आपले करिअर घडवले. मुंबईने कंगनाला ओळख दिली. त्याच मुंबईला भलेबुरे म्हणणा-या कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, असे विधान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केले आहे.

मुंबई सुरक्षित वाटत नाही, मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते, असे कंगनाने म्हटले होते. यावरून संजय राऊत यांनी कंगना रणौत हिला खडे बोल सुनावले. संजय राऊत म्हणाले की, मुंबई पोलीस मुंबई शहराचं सातत्याने रक्षण करत आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना मुंबईत राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ऐरे-गैरे काहीही बोलत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी, असे म्हटले होते.

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्यानंतर लगेचच कंगनाने ट्विट करत, मी ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे. कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला रोखून दाखवा, असे म्हटले. कंगनाच्या या ट्विटनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नसल्याचे विधान केले आहे. एबीपी माझाला त्यांनी धावती प्रतिक्रिया दिली. त्यामुळे संजय राऊत यांच्या कंगनावर कारवाई करण्याच्या विधानानंतर गृहमंत्री देशमुख कंगना रणौतवर कारवाई करणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. कंगनाला खरोखर मुंबईत येण्यापासून महाराष्ट्र सरकार रोखणार का, असाही एक प्रश्न उपस्थित झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER