राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारायला जाताना ड्रेससाठी पैसे नव्हते कंगनाकडे

कंगना रनौतने (Kangana Ranaut) कोणीही गॉडफादर नसताना स्वतःच्या मेहनतीने आणि अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये (Bollywood) प्रचंड यश मिळवले आहे. सध्या ती एका सिनेमासाठी 15 ते 25 कोटी रुपये घेते असे सांगितले जाते. मुंबईत तिचे एक आलिशान ऑफिस तर आहेच एक भलेमोठे घरही आहे. हिमाचलमध्येही तिने भव्य असा बंगला बांधलेला आहे. मात्र याच कंगनाने पुरस्कार समारंभासाठी चांगला ड्रेस घेण्यासाठी पैसे नव्हते असे वक्तव्य केले आहे. तिच्या या वक्तव्यावर विश्वास बसणे तसे कठिणच आहे. कारण तिला जो पुरस्कार मिळाला तेव्हा तिने काही सिनेमात काम केलेले होते. कंगनाने पुरस्कार समारंभासाठी पैेसे नसल्याने ड्रेस स्वतः डिझाईन केल्याचे वक्तव्य तिच्या फॅनने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोवर प्रतिक्रिया देताना केले आहे.

कंगनाच्या एका फॅनने ट्वविटर कंगनाचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत कंगना माजी राष्ट्रपति प्रतिभा पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार घेताना दिसत आहे. या फोटोसोबत फॅनने म्हटले आहे की, कंगनाला हा पुरस्कार फॅशन सिनेमात सहाय्यक अभिनेत्रीच्या कामासाठी मिळाला होता. कंगनाचा हा सिनेमा 2008 मध्ये रिलीज झाला होता. हे ट्विट रिट्विट करीत कंगनाने म्हटले आहे, ‘पहिला राष्ट्रीय पुरस्कार. या पुरस्कारासोबत माझ्या अनेक आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. तेव्हा मी सगळ्यात तरुण अभिनेत्री होते जिला हा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार मला नायिकाप्रधान सिनेमातील भूमिकेसाठी मिळाला होता आणि तोही महिला राष्ट्रपतींच्या हातून.

यानंतर कंगनाने या समारंभात परिधान केलेल्या ड्रेसबाबतची आठवण लिहिली आहे. कंगना लिहिते, हा ड्रेस मी स्वतः डिझाईन केलेला आहे कारण नवीन आणि चांगला ड्रेस घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. माझा हा सूट वाईट नव्हता. कंगनाचा हे ट्विट प्रचंड व्हायरल झाले असून तिचे फॅन्स प्रचंड प्रतिक्रिया देत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER