निकिता तोमरच्या मारेकऱ्याला फाशी देण्याची कंगनाची मागणी

Kangana Ranaut

दिल्लीजवळच्या फरीदाबादमध्ये एका कॉलेज विद्यार्थिनीला कॉलेजच्या बाहेरच गोळ्या घालून मारण्यात आले. या मुलीच्या मागे अनेक दिवस एक मुलगा लागला होता आणि लग्न करण्यासाठी आग्रह धरीत होता. परंतु मुलगी लग्नाला तयार होत नसल्याने त्याने तिला गोळ्या घातल्या. या प्रकरणावर संपूर्ण बॉलिवूड (Bollywood) संताप व्यक्त करीत आहे. कंगनाने (Kangana Ranaut) तर कॉलेज विद्यार्थिनी निकिता तोमरला (Nikita Tomar) शौर्य पुरस्कार देण्याची मागणी केली असून तिचा मारेकरी तौसिफचे एनकाउंटर करावे अशीही मागणी केली आहे. तौसिफने मुलीला लग्नाची मागणी घालण्यासोबतच मुस्लिम धर्म स्वीकारण्यासही सांगितले होते. मात्र तिने तौसिफला स्पष्टपणे नकार दिला होता. या संपूर्ण प्रकरणाला लव्ह जिहाद म्हटले गेले आहे.

ट्विटरवर वेगवेगळ्या विषयांवर आपली मते जाहीर करणाऱ्या कंगनाने या विषयावरही मत व्यक्त केले आहे. कंहनाने म्हटले आहे की, निकिताच्या शौर्याचा सन्मान करणे आवश्यक असून तौसिफचे एनकाउंटर केले पाहिजे. तसेच फ्रांसमध्ये जे घडले त्यामुळे संपूर्ण जग हैराण आहे. परंतु या जिहादींना कायद्याची भिती नाही आणि त्यांना लाजही वाटत नाही. एका मुलीने मुस्लिम धर्म स्वीकारण्यास नकार दिला म्हणून तिची भर दिवसा गोळी घालून हत्या केली. यावर त्वरित कारवाई होण्याची आवश्यकताही कंगनाने व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER