सरदार पटेल जयंती निमित्तच्या ट्विटमधून कंगनाची गांधी, नेहरूंवर टीका

Kangana Ranaut

नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना राणावतने (Kangana Ranaut) सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ( Sardar Patel Jayanti) अभिवादन करण्यासाठी केलेल्या ट्विटमध्ये (Kangana Ranaut Tweet) महात्मा गांधी आणि नेहरूंवर टीका केल्याने तिचे ट्विट चर्चेत आहेत.

कंगनाने ट्विटमध्ये लिहिले, “त्यांनी गांधींना खुश करण्यासाठी भारताच्या पहिल्या पंतप्रधान पदाच्या स्वरुपात, आपल्या सर्वात योग्य आणि निवडलेल्या पदाचे बलिदान दिले. कारण नेहरू चांगले इंग्रजी बोलतात, असे गांधींना वाटत होते. यामुळे सरदार पटेलांना नाही, तर संपूर्ण देशालाच अनेक दशके नुकसान सोसावे लागले. ज्यावर आपला अधिकार आहे, ते आपण काहीही लाज न बाळगता घ्यायला हवे.”

यानंतर कंगनाने दुसरे ट्विट केले – ते भारताचे खरे लोहपुरुष आहेत. गांधीजींना नेहरूंप्रमाणे एक कमकुवत बुद्धी असलेली व्यक्ती हवी होती. जेणेकरून त्यांना त्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवता येईल आणि नेहरूंना समोर करून निर्णय घेता येतील. ही एक चांगली योजना होती. मात्र, गांधीजी गेल्यानंतर जे झाले ती मोठी आपत्ती होती.

आणखी एका ट्विटमध्ये कंगना म्हणाली, ‘भारताचे लौह पुरुष सरदार पटेल यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करते. आपण एक असे व्यक्ती होतात, ज्यांनी अम्हाला आजचा भारत दिला. मात्र, आपण पंतप्रधान पदाला नकार देऊन, आमच्या महान नेतृत्वाला आणि दूरदृष्टीला आमच्यापासून दूर केले. आम्हाला आपल्या निर्णयाबद्दल अत्यंत खेद वाटतो.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER