
मुंबई :- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार-२०१९ सोहळा राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात सोमवारी पार पडला. या सोहळ्यात अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. ‘पंगा’ आणि ‘मणिकर्णिका’ या चित्रपटात तिनं केलेल्या जबरदस्त अभिनयासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा सिनेमागृहात रिलीज झालेला चित्रपट ‘छिछोरे’ला मिळाला आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा चित्रपट ‘छिछोरे’ला मिळाला आहे.
कंगनासोबतच अभिनेता मनोज वाजपेयी यानंदेखील सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्कारावर आपलं नावं कोरलं. त्याला ‘भोंसले’ या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. दरम्यान कंगनाचे चाहते सध्या प्रचंड खूश आहेत. सोशल मीडियाद्वारे (Social Media) त्यांनी कंगनावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
ही बातमी पण वाचा : उद्या कंगनाच्या वाढदिवशी ‘थलाईवी’चा ट्रेलर मुंबई आणि तामिळनाडूत होणार रिलीज
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला