कंधार: मिरचीत भेसळ करणा-या गिरणी चालकांवर कार्यवाही करा- जनता दल (सेक्यूलर) ची मागणी

कंधार :- तालुका प्रतिनिधी- अर्धापूर, कासराळी, धर्माबाद हिमायतनगर येथील अनेक गिरणी चालक भेसळयुक्त मिरचीची पावडर तयार करून जिल्हयातील अनेक भागात सर्रास पणे विक्रीकरून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. भेसळ करणार्‍या या गिरणी चालकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जनता दल ( सेक्युलर) च्या वतीने नांदेडच्या अन्न व भेसळ अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात अली आहे.

पूर्णा: चित्तथरारक मल्लखांबाच्या प्रात्यक्षिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर,कासराळी, धर्माबाद, हिमायतनगर येथील मिरची गिरणी चालक मिरचीचे डेट, बी, पांढरी मिरची, तांदळाची कणकी व कलर ची भेसळ करून पावडर तयार करीत आहेत व खुली पैकींग करून मिरची पावडर म्हणून कंधार,लोहा, मुखेड, बिलोली, देगलूर, नरसी, नायगाव, उमरी, भोकर, धर्माबाद, कासराळी, हिमायतनगर नांदेड मधील इतवारा भागा सह अनेक खेडे गावात सर्रास पणे विक्री करीत आहेत. त्यामुळे नागरिकांना गंभीर आजार होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील नागरिकांच्या जीविताशी खेळणार्‍या गिरणी चालकावर कारवाई करण्याची मागणी जनता दल ( सेक्युलर) चे जिल्हा उपाध्यक्ष महेमूदखां पठाण यांनी नांदेड येथील अन्न भेसळ अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे,संबंधितावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा जनता दल (से.) च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेवटी निवेदनात देण्यात आला आहे.