कामसूत्रानुसार असे पुरुष करतात स्त्रियांना आकर्षित

relation

प्राचीन काळात लिहिलेले ‘कामसूत्र’ हे स्त्री आणि पुरुषाच्या नात्याला दृढ करण्यासाठी पूर्वी पासूनच फार महत्वाची भूमिका बजावीत आलेले आहे. कामसूत्र म्हंटले की बऱ्याच जणांच्या डोक्यात फक्त सेक्स लाईफ बद्दल चे सूत्र असलेले एखादे गद्य असा विचार येतो. परंतु कामसूत्र हे फक्त सेक्स लाईफ बद्दलच मार्गदर्शन न करता यात स्त्री आणि पुरुषांच्या एकंदरीत नात्यातला गोडवा कसा टिकविला जावू शकतो या बद्दल केलेले मार्गदर्शन आहे.

आता आपण जाणून घेऊया की कामसूत्रानुसार कोणत्या प्रकारचे पुरुष किंवा कोण-कोणते गुण असलेले पुरुष स्त्रियांना आकर्षित करतात.

ही बातमी पण वाचा : पती करतात ‘या’ ५ कारणांमुळे पत्नीवर संशय

विद्वताचा गुण
कामसूत्रानुसार विद्वत्ता तो गुण आहे जो पुरुषामध्ये असायला पाहिजे. असे गुण असणारे पुरुष महिलांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरतात.

महत्त्वाकांक्षी आणि उत्साही
कामसूत्रानुसार जे पुरुष महत्त्वाकांक्षी आणि उत्साही असतात त्यांच्याकडे स्त्रिया लवकर आकर्षित होतात.

भावनांना समजणारा
ज्या पुरुषांमध्ये विश्वास आणि दुसर्‍यांची भावना समजण्याचा गुण असतो ते स्त्रियांना आकर्षित करण्यास यशस्वी ठरतो.

कहाणी ऐकवण्याचा गुण
कामसूत्रानुसार ज्या पुरुषांमध्ये कविता किंवा गोष्ट ऐकवण्याची आणि वर्णन करण्याची योग्यता असते त्यांच्याकडे स्त्रिया लवकर आकर्षित होतात.

साहसी आणि शूरवीर
कामसूत्रात उल्लेख करण्यात आलेल्या सूत्रांनुसार साहसी आणि शूरवीर पुरुष नेहमी महिलांना आकर्षित करण्यास यशस्वी ठरतात.

स्थायी रुपेण प्रेम करणारा
कामसूत्रानुसार प्रत्येक महिलांची पुरुषांकडून हीच अपेक्षा असते की त्याने आपल्या स्त्रीला स्थायी रुपेण प्रेम करावे.

दुसर्‍यांच्या निंदेपासून दूर राहणारा
कामसूत्रात उल्लेख करण्यात आलेल्या गुणांप्रमाणे पुरुषांना नेहमी त्यागी असायला पाहिजे आणि दुसर्‍यांची निंदा न करणारा पाहिजे.

शक्तिशाली आणि मोठ्यामनाचा
शक्तिशाली पुरुषपण स्त्रियांना आवडतात. तसेच महिलांप्रती प्रेमभाव व्यवहार करणारे पुरुष स्त्रियांमध्ये प्रतिष्‍ठा मिळवतात.

स्त्रियांवर मोहित न होणारा
कामसूत्रानुसार जो पुरुष कुठल्याही स्त्रीवर मोहित होत नाही तो पुरुष श्रेष्ठ मानले जातो, असे गुण असणारे पुरुष स्त्रियांना जास्त आवडतात.

ही बातमी पण वाचा : नात्यात दुरावा आलायं ? मग हे करा !