टी -२० क्रिकेटमध्ये कामरान अकमलने केले असे, जे धोनी पण करू नाही शकला, बनवला एक खास जागतिक विक्रम

Kamran Akmal beats THIS wicketkeeping record of MS Dhoni .jpg

महेंद्रसिंग धोनीला (Mahendra Singh Dhoni) जगातील सर्वात वेगवान विकेटकीपर म्हटले जाते. धोनी विकेटच्या मागे इतक्या लवकर काम करतो की जगातील इतर क्रिकेटपटूदेखील त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेटकीपिंगशी संबंधित सर्व मोठे विक्रम धोनीकडे आहेत. दुसरीकडे खराब विकेटकीपिंगसाठी पाकिस्तानचा यष्टिरक्षक कामरान अकमल अनेक वेळा ट्रोल झाला आहे. यष्टीरक्षणाच्या मागे स्टंपिंगची संधी आणि झेल सोडणे यामुळे त्याच्या संघालाही बर्‍याचदा पराभावाला सामोरे जावे लागले, पण आता यापूर्वी कोणत्याही विकेटकीपरने न केल्याचा विक्रम त्याने केला आहे.

टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टंपिंग करण्याचा विक्रम अकमलच्या नावे अगोदरच होता, परंतु टी -२० क्रिकेटमध्ये १०० स्टंपिंग करणारा तो जगातील पहिला विकेटकीपर ठरला आहे. पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या राष्ट्रीय टी -२० चषक दरम्यान त्याने हा पराक्रम केला. सेंट्रल पंजाब आणि साऊथ पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात कामरानने इतिहास रचला. साऊथ पंजाबचा कर्णधार शान मसूद झफर गौहरच्या चेंडूवर स्टम्पिंग बाद होताच, कामरानच्या खात्यात १०० वे स्टम्पिंग आले.

या प्रकरणात धोनी कामरानच्या मागे आहे. धोनीच्या खात्यात ८४ स्टंपिंग आहेत, तर कुमार संगकारा ६० स्टंपिंगसह तिसर्‍या क्रमांकावर आहेत. दिनेश कार्तिकच्या खात्यात ५९ स्टंपिंग आहेत आणि या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे, तर मोहम्मद शहजाद ५२ स्टंपिंगसह पाचव्या क्रमांकावर आहेत. कामरानच्या आधी कोणत्याही विकेटकीपरने टी -२० क्रिकेटमध्ये १०० स्टंपिंग केले नाहीत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटविषयी सांगायचे तर सर्व फॉर्मेटमध्ये धोनीच्या खात्यात १२३ स्टंपिंग्स आहेत आणि तो या यादीत आघाडीवर आहे. दुसर्‍या क्रमांकावर कुमार संगकारा ९९ स्टंपिंग्ससह आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER