कमलनाथ यांचा माफीनामा ; राष्ट्रीय महिला आयोगाकडून तक्रार दाखल

Kamal Nath apology-minister-imarti-devi

भोपाळ : भाजपच्या महिला नेत्या इमरती देवी (Imarti Devi) यांचा आक्षेपार्ह शब्दात उल्लेख केल्यानंतर आता कमलनाथ यांनी माफी मागितली आहे. माझं व्यक्तव्य कुणाला आक्षेपार्ह वाटलं असेल तर आपण माफी मागत असल्याचं कमलनाथ म्हणाले. मात्र, कमलनाथ (Kamal Nath) यांनी माफी मागितली असली तरी राष्ट्रीय महिला आयोगानं त्यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसंच या वक्तव्याबद्दल त्यांच्याकडून स्पष्टीकरणही मागितलं आहे.

राष्ट्रीय महिला आयोग मध्यप्रदेश विधानसभेचे विरोधी पक्षनेते कमलनाथ यांनी केलेल्या अपमानास्पद आणि बेजबाबदार वक्तव्याची निंदा केली आहे. कमलनाथ यांच्याकडून आक्षेपार्ह वक्तव्याबाबत स्पष्टीकरणही मागितलं आहे. तसंच NWCने निवडणूक आयोगाला याबाबत कारवाई करण्याची सूचनाही केल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते कमलनाथ यांनी जाहीर सभेत भाजपच्या मंत्री इमरती देवी यांचा ‘आयटम’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर या वादाला तोंड फुटलं. दरम्यान, कमलनाथ यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करुन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER