कमल हासन यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त चित्रपटाचा टीझर जारी करत चाहत्यांना केले आश्चर्यचकित

Kamal Haasan - Vikram

आपल्या वाढदिवस निमित्त प्रसिद्ध अभिनेता कमल हासन (Kamal Haasan) यांनी आपल्या चाहत्यांना चांगलेच सरप्राईज दिले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी या चित्रपटाचे पोस्टर लाँच केले होते. आता या चित्रपटाचा टीझरही लाँच करण्यात आला आहे. विक्रम (Vikram) असे या चित्रपटाचे नाव आहे. याचे दिग्दर्शन लोकेश कनागराज यांनी केले आहे.

टीझरच्या सुरूवातीला, कमल हासन स्वयंपाकघरात आहे, उत्तम भोजन शिजवत आहे आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करत आहे. दुसरीकडे, ते बर्‍याच बंदुकांमध्ये गोळ्या भारत आहे आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवत आहे. मग मास्क घातलेले अतिथी येतात आणि डिनर टेबल तयार आहे. बंदूक आणि शस्त्र टेबलच्या खाली लपवून ठेवलेले आहे, हे कोणत्याही अतिथीला माहिती नाही. इथेच टीझर संपेतो.

दिग्दर्शक लोकेश कनागराज यांनी १९८६ मध्ये आलेल्या कमल हसन यांच्या विक्रम या चित्रपटाचे नाव घेतले आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले की, टीझर बनवताना कोविड -१९ (COVID-19) शी संबंधित सर्व मार्गदर्शक सूचना पाळल्या गेल्या आहेत.

चित्रपटाचे शूटिंग या महिन्यापासून सुरू होईल. दिग्दर्शक विक्रमसाठी हा चित्रपट एक मोठा टप्पा आहे. २०१७ मध्ये त्यांनी दिग्दर्शनाची सुरुवात केली, ज्यासाठी त्यांचे खूप कौतुक झाले. मागील वर्षी कार्तीसह त्यांचा कैथी हा चित्रपट यशस्वी झाला. त्यांचा तिसरा चित्रपट मास्टर आहे. यामध्ये अभिनेता विजय मुख्य भूमिकेत आहे. हा एक मोठा बजेट चित्रपट आहे जो कोविड -१९ मुळे अद्याप प्रदर्शित झाला नाही.

कमल हासन यांच्या चित्रपटाची निर्मिती राज कमल फिल्म्स इंटरनेशनल करणार आहे. हे प्रोडक्शन बॅनर स्वतः कमल हासन यांचे आहे. चित्रपटाचे चित्रीकरण चेन्नई आणि आसपासच्या भागात केले जाणार आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER