कमल हसन यांच्या पक्षाला गळती

Kamal Hassan

चेन्नई : ज्येष्ठ अभिनेते कमल हसन (Kamal Haasan) यांच्या मक्कल निधी मय्यम (एमएनएम) (MNM) पक्षाला तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. एमएनएमचे क्रमांक एक आणि दोनचे नेते कमल स्वतः आणि महेंद्रन यांचाही पराभव झाला. त्यानंतर पक्षात असंतोष पसरला आहे. पक्षात लोकशाही नाही, असा आरोप करत पक्षाचे उपाध्यक्ष महेंद्रन यांनी राजीनामा दिला.

महेंद्रन म्हणालेत की, कमल हसन यांची पक्ष चालवण्याची पद्धत योग्य नाही. त्यांचे मोजके सल्लागार पक्ष चालवत आहेत. कमल हसन यांनी महेंद्रन यांना विश्‍वासघातकी म्हणत त्यांचा धिक्कार केला. महेंद्रन यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यावर – पक्षाची साफसफाई झाली आहे, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया दिली.

दक्षिणेत चित्रपट कलाकारांना राजकारणात चांगले यश मिळते हे लक्षात घेऊन कमल हसन यांनी मक्कल निधी मय्यम या पक्षाची स्थापना केली व प्रचंड जाहिरातरातबाजी करत तामिळनाडूच्या विधानसभेची निवडणूक लढवली. पण त्यांच्या पक्षाला खातेही उघडता आले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button