काँग्रेसच्या बॅनरवर शिवसेनेच्या मातब्बर नगरसेवकांचे फोटो झळकले, चर्चेला उधाण

Congress Banner - Nana Patole

कल्याण : कल्याणमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतीवली चौकात लावण्यात आलेल्या काँग्रेसच्या एका बॅनरवर थेट शिवसेनेचे मातब्बर आणि नामांकित अशा दोन नगरसेवकांचे फोटो झळकले आहेत. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. या बॅनरवर शिवेसना (Shiv Sena) नगरसेवक मल्लेश शेट्टी आणि नविन गवळी (Navin Gavli) यांचे फोटो झळकले आहेत.

काँग्रेस (Congress) नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबादारी सोपवण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर नाना पटोले आज पहिल्यांदा कल्याणमध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी येत आहेत. या कार्यक्रमानिमित्त त्यांचे कल्याण नगरीत स्वागत आहे, असा बॅनर लोकनेते नाना पटोले विचारमंचच्यावतीने लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी (Mallesh Shetty) आणि नवीन गवळी यांचेही फोटो आहेत. हा बॅनर नेतीवली नाक्यावर लावण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER