शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप, राष्ट्रवादी आणि मनसेची ताकद वाढली

kalyan-lok-sabha-the-strength-of-bjp-ncp-and-mns-increased

मुंबई : कल्याण लोकसभेतील (Kalyan Lok Sabha) सर्व सरपंचपदाच्या निवडणुका पार पडल्या आहेत. यामध्ये शिवसेना (Shivsena), भाजपला (BJP)एक समान सरपंच पद मिळाले आहे . त्याच सोबत राष्ट्रवादीला (NCP) सरपंच पद मिळाले असून यावेळी मनसेलाही यश मिळाले आहे .

सरपंच निवडणुकीत दोन ठिकाणी मनसेने सेनेला पाठिंबा दिला आहे आणि एक ठिकाणी भाजपला पाठिंबा दिल्याचे दिसून आले आहे. तर राष्ट्रवादीनेही सेनेला पाठिंबा दिल्याचे दिसून आलं आहे. कल्याण लोकसभेचा विचार करता शिवसेनेला पाच, भाजपला पाच, राष्ट्रवादीला तीन आणि मनसेला एक सरपंच पद मिळाले असून सहा ग्रामपंचायतींनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.

ठाणे जिल्हा असो वा कल्याण याठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व नेहमीच दिसून आलं आहे. मात्र आता शिवसेनेच्याच बालेकिल्ल्यामध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि मनसेने सुद्धा आपली ताकद वाढविल्याचं या निवडणुकीत दिसून आले आहे. येणाऱ्या लोकसभेमध्ये शिवसेनेसाठी हे धोक्याचे ठरू शकते .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER