कल्याण काळे तो झांकी है! मोहिते-पाटील, पिचड, क्षीरसागर ते सोपल या दिग्गजांच्या मनात काय ?

Sharad Pawar

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांनी दोन दिवसापूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मेगाभरती होणार असल्याची घोषणा केली. त्याची प्रचिती हळूहळू येऊ लागली आहे. नुकतंच जनसुराज्य पक्षाचे माजी आमदार राजीव आवळे (Rajiv Awale NCP) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत माजी आमदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले कल्याणराव काळे दिसले. पंढरपुरातील एका कार्यक्रमात कल्याणराव काळे (Kalyan Kale) यांनी पवार सांगतील त्या पद्धतीने काम करु असं म्हटलं. त्यामुळे कल्याण काळे उद्या राष्ट्रवादीत असतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यातच कल्याण काळे तो झांकी है, अशा पद्धतीने सध्या राष्ट्रवादीचे नेते वावरत आहेत.

मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अख्खी राष्ट्रवादी खाली झाल्याचे चित्र होते.

मधुकर पिचडांसारखे स्थापनेपासूनचे बुरुज ढासळले. इतकंच काय तर राणा जगजितसिंह पाटील यासारख्या नात्यातल्या माणसांनीही साथ सोडली. विजयसिंह मोहिते पाटील, बबनराव पाचपुते, भास्कर जाधव, जयदत्त क्षीरसागर, दिलीप सोपल यासारखे राष्ट्रवादीचे बिनीचे शिलेदारही पवारांना सोडून भाजप-शिवसेनेत गेले.

मात्र पवारांनी महाविकास आघाडीची स्थापना करुन महाराष्ट्राच्या राजकारणालाच कलाटणी दिली. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. परिणामी काँग्रेस-राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवर त्यांचा निर्णय बूमरँग झाला.

शरद पवारांची साथ सोडणा-या दिग्गज नेत्यांचा विधानसभा – लोकसभेत पराभव झाला. शरद पवार यांची साथ सोडणाऱ्या बहुतांश आमदारांना जनतेने नाकारलं.

मात्र, आता पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मेगाभरती होणार असे संकेत खुद्द राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जयंत पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सोडन गेलेले मधुकर पिचड , वैभव पिचड , राणा जगजितसिंह पाटील , भास्कर जाधव, जयदत्त क्षीरसागर , पांडुरंग बरोरा, दिलीप सोपल, शेखर गोरे , बबनराव पाचपुते , धनंजय महाडिक , उदयनराजे भोसले , शिवेंद्रराजे भोसले , चित्रा वाघ, संदीप नाईक गणेश नाईक या नेत्यांच्या मनात काय असेल अशी कुजबुज राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER