शिवसेना-भाजपला धक्का ; कार्यकर्त्यांनी हाती घेतला मनसेचा झेंडा

MNS

मुंबई : कल्याण-डोंबिवलीत शिवसेना आणि भाजपमधील शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला. माजी आमदार प्रकाश भोईर आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख वैभव किणी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला आहे .

शिवसेना-भाजपच्या जवळपास १०० कार्यकर्त्यांनी मनसेची वाट धरली आहे . ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना – भाजपमध्ये मोठे खिंडार पडले आहे .

दरम्यान काही दिवसांपूर्वीच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला . वरळीतील एनजीओ, सार्वजनिक मंडळे यांचे कार्यकर्ते आणि काही सामान्य नागरिकांनी मनसेत प्रवेश केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER