मिर्जापूर २ चे कालीन भैय्या म्हणाले- वडिलांनी माझा कोणताही चित्रपट नाही पाहिला, अभिनेत्याने सांगितले त्याचे कारण

Mirzapur

बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी आपली मिर्जापूर २ या वेब सीरिजबद्दल चर्चेत आहे. ही मालिका २३ ऑक्टोबरला अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल. पंकजने सांगितले की आजपर्यंत वडिलांनी त्याच्या कोणताही चित्रपट पाहिला नाही. त्याच्या गावात आजही टीव्ही नाही. यासह त्याने आपल्या वडिलांशी असलेल्या संबंधांबद्दल सांगितले.

एका मुलाखतीत पंकज त्रिपाठी म्हणाला, ‘बाबूजी आणि माझ्यात फारसा संवाद होत नाही. माझ्या आयुष्यात का आणि काय चालू आहे, ते माझ्याशी बसून बोलत नाहीत. त्यांनी मला कशासाठीही थांबवले नाही. मिर्झापूर सिरिज म्हणजे काय याची त्यांना कल्पनाही नाही. त्यांना माहित नाही की मी चित्रपट करतो.

पंकज पुढे म्हणाला, ‘जर मी गेलो तर ते (वडील) फक्त इतकेच विचारतात सर्व ठीक आहे काय? म्हणून मी म्हणतो होय सर्व ठीक आहे. म्हणून त्यांना आजपर्यंत फारशी कल्पना नाही, त्यांनी थिएटरमध्ये माझा कोणताही चित्रपट बघीतला नाही. कधी कोणी काही देखावे दाखवले असतील आणि त्यांनी ते पहिले असतील, ही वेगळी बाब आहे. ते (वडील) टीव्ही पाहत नाही, ते त्यांना आवडत नाही. आजही माझ्या गावात टीव्ही नाही. मी बर्‍याच वेळा म्हटले आहे की मी टीव्ही लावून देतो कमीत कमी माझे चित्रपट बघा पण आई आणि वडिलांनी नाही म्हटले.

पंकज त्रिपाठी मिर्जापूर २ या वेब सीरिजमध्ये कालीन भैयाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मालिकेच्या पहिल्या सत्रात पंकजच्या कार्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पंकज त्रिपाठी व्यतिरिक्त या मालिकेत अली फजल, दिव्येंदू शर्मा, रसिका दुग्गल, विजय वर्मा आणि कुलभूषण खरबंदा सारख्या कलाकारांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER