मंदिरं तर उघडली नाहीत ; आता रामलीलासाठी भाजपचे मुख्यमंत्र्यांना पत्र

CM Uddhav Thackeray-Atul Bhatkhalkar.jpg

मुंबई : ‘राज्यात रामलीलेची मोठी परंपरा आहे. कोरोना (Corona) काळात रामलीला अतिशय सहज आयोजित केली जाऊ शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) मंदिरे खुली करण्यास परवानगी दिली नाही. मग आता किमान रामलीला आयोजनास तरी परवानगी द्यावी,’ अशा मागणीचे पत्र भाजपचे नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवले आहेत.

भातखळकरांनी यावेळेसही शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्त्वाची उद्धव ठाकरेंना आठवण करून दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी किमान बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व लक्षात ठेवावे. बाळासाहेब आज असते, तर त्यांनी सर्वप्रथम मंदिरं खुली केली असती आणि त्यानंतर बार, रेस्टॉरंट आणि हॉटेल उघडली असती, असं भातखळकर म्हणाले.

तर, भातकळकरांच्या या मागणीवर शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी बातखळकरांना प्रत्युत्तर दिले आहे.

‘गेल्या कित्येक वर्षांपासून काही जण रामाच्या नावानं राजकारण करत आहेत. कीकडे राज्यात कोरोनाचे संकट आहे.

त्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घेतली आहे. मात्र तरीही अशा मागण्या केल्या जात आहेत. कोरोना संकट संपताच मुख्यमंत्री स्वत: सगळी धार्मिकस्थळं सुरू करतील, असंही सरनाईक म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER