पतिची निर्मिती असलेल्या चित्रपटातून काजोलही ओटीटी प्लॅटफॉर्मवर

Kajol

ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) अनेक मोठ्या कलाकारांनी प्रवेश केला असून त्यात आता काजोलचाही समावेश होत आहे. काजोल ‘त्रिभंगा’ नावाच्या चित्रपटात काम करणार असल्याची बातमी आम्ही तुम्हाला दिली होतीच. काजोलचा हा चित्रपट जानेवारीमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. स्वतः काजोलनेच सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे काजोलच्या या चित्रपटाची निर्मिती काजोलचा पति अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अजय देवगन (Ajay Devgan) यानेच नेटफ्लिक्ससाठी (Netflix) केली आहे.

काजोलचे इंस्टाग्राम वर 11 लाख फॉलोअर्स झाले आहेत. 11 लाखांचा आकडा गाठल्याच्या निमित्ताने काजोलने तिच्या फॅन्सशी लाईव्ह चॅट केले. यावेळी काजोलने तिच्या आगामी चित्रपटांबाबत आणि डिजिटल प्रवेशाबाबत माहिती दिली. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रवेशाबाबत बोलताना काजोलने सांगितले, माझा पुढील चित्रपट ‘त्रिभंगा’ जानेवारीत ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. तीन महिलांची कथा सांगणाऱ्या या चित्रपटात महिलांचे एक वेगळे रूप दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. या चित्रपटात काम करताना मला खूप आनंद झाला असेही काजोल यावेळी म्हणाली.

‘त्रिभंगा’ (Tribhanga) मध्ये एकाच घरात राहाणाऱ्या तीन पिढ्यातील महिलांची कथा दाखवण्यात आली आहे. काजोलची यात खूपच सशक्त भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. खरे तर काजोलचा हा चित्रपट गेल्या वर्षीच प्रदर्शित होणार होता. त्यानंतर या वर्षीच्या एप्रिल मे मध्ये प्रदर्शित करण्याचा विचार सुरु होता. परंतु लॉकडाऊनमुळे चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. आणि आता पुढील वर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER