30 ऑक्टोबरला लग्नाच्या बेडीत अडकणार काजल अग्रवाल

Kajal Agarwal Gautam Kichlu

दक्षिणेतील प्रख्यात अभिनेत्री आणि बॉलिवूडमध्ये (Bollywood) सिंघम चित्रपटाने लोकप्रिय झालेली अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Agarwal)30 ऑक्टोबरला लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. गेल्या एक वर्षापासून काजलच्या लग्नाची तयारी सुरु आहे. प्रख्यात व्यावसायिक गौतम किचलू (Gautam Kichlu) आणि काजलची एका कार्यक्रमात भेट झाली होती. पहिल्याच भेटीत त्यांचे एकमेकांवर प्रेम जमले.

त्यानंतर दोघांनीही एकमेकांच्या घरच्यांना सांगितले. घरच्यांनी एकत्र येत या दोघांच्या लग्नाला परवानगी दिली. गेल्या वर्षी या दोघांचा साखरपुडा झाला होता.

आता काजलनेच 30 ऑक्टोबर रोजी मुंबईत लग्न होणार असल्याचे सांगितले आहे. कोरोनाकाळ असल्याने अत्यंत सावधानी आणि संपूर्ण काळजी घेऊन आम्ही हा लग्न सोहळा आयोजित केला आहे. हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा, कौटुंबिक सोहळा असल्याने यात फक्त आमचे कुटुंबियच हजर राहाणार आहेत. लग्नानंतर बेंगलुरु आणि मुंबईत भव्य रिसेप्शन आयोजित करण्यात येणार असल्याचेही काजलने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER