काजल अग्रवाल अडकली लग्नाच्या बेडीत

Kajal Aggarwal

हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटातील अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) 30 ऑक्टोबरला लग्न करणार असल्याची माहिती आम्ही आमच्या वाचकांना दिली होती. मुंबईच्या ताजमहल हॉटेलमध्ये काजल, तिचा बॉयफ्रेंड उद्योगपती गौतम किचलूसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. अत्यंत आलिशान, भव्य पद्धतीने परंतु केवळ मोजके नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत काजलने सात फेरे घेतले. स्वतः काजलनेच आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.

काजलने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये हे दांपत्य प्रचंड आनंदात असल्याचे दिसत आहे. रंगीत फोटोंसोबत काजलने एक ब्लॅक अँड व्हाइट फोटोही शेअर केला आहे. या फोटोला काजलने कॅप्शन दिले आहे, वादळापूर्वीची शांतता. त्यानंतर काजलने हळदी समारंभापासून सात फेरे आणि रिसेप्शनपर्यंतचे फोटो शेअर करून प्रशंसकांपर्यंत लग्नाची माहिती पोहचवली. लग्नासाठी काजलने खऱ्या दागिन्यांसोबतच फुलांपासून बनवलेले दागिनेही घातल्याचे फोटोत दिसत असून यामुळे ती आणखी सुंदर दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER