मालदीवमध्ये हनीमूनला गेली काजल अग्रवाल

Kajal Agrwala Maldives Honeymoon

बॉलिवूड (Bollywood) आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका काजल अग्रवालने (Kajal Agarwal) काही दिवसांपूर्वीच इंटेरियर डिझायनर बॉयफ्रेंड गौतम किचलूबरोबर (Gautam Kichlu) मुंबईत लग्न केले होते. कोरोनामुळे फक्त नातेवाईक आणि अत्यंत जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत काजलने लग्न केले होते. लग्नानतंर दोघांनाही मुंबईतील नव्या आलिशान घरात गृहप्रवेशही केला होता. लग्नानंतर काजल आणि गौतम हनीमूनसाठी कुठे जातील याची चर्चा बॉलिवू़डमध्ये रंगली होती. आता काजलनेच मालदीवमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने हे नवदांपत्य मालदीवमध्ये हनीमूनसाठी गेल्याचे समोर आले आहे.

Kajal Agarwal honeymoon photos from Maldives goes viral on social media - Publicist Paperएवढेच नव्हे तर काजलने शनिवारी तिच्या पासपोर्टचा फोटो शेअर केला असून त्यावर तिचे नाव काजल किचलू असे दिसत आहे. ती म्हणते मिसेस किचलू म्हणवून घ्यायला मी हळू हळू सरावते आहे. असे संबोधन खूपच चांगले आणि आनंद आहे. मिसेस किचलू म्हणवून घेणे मला आवडते. माझ्या जीवनातील हा नवा अध्याय असून तो मी स्वीकारला आहे असेही काजलने म्हटले आहे.

काजलने तिचे आणि गौतमचे मालदीवमधील खूप फोटो सोशल मीडियावर टाकले असून ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदरही दिसत आहे. फोटोत दोघांची जोडी आनंदी आणि सुंदर दिसत आहे. कोरोनाची भिती असल्याने सर्व प्रकारची काळजी घेऊन मालदीवमधील वॉटर व्हिला हॉटेलमघ्ये राहात आहेत. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये असलेल्या काजलने हॅटही घातलेली आहे. एका फोटोत हे दोघेही हॉटेलच्या बाहेर उभे असलेले दिसत आहेत. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये काजलने लिहिले आहे- पुन्हा प्रवास करताना खूप चांगले वाटत आहे. कोरोना असल्याने आम्ही सर्व प्रकारची काळजी घेतली आहे. सर्व काही लवकरच सामान्य होईल असेही तिने म्हटले आहे.

काजल यापूर्वीही तिच्या आईवडिलांसोबत मालदीवला फिरायला गेली होती. त्यामुळेच तिने पुन्हा एकदा मालदीव येथे प्रवास असे कॅप्शन एका फोटोला दिले आहे. तसेच ‘अल्टरनेटिव्ह प्रोफेशन’ असे म्हणत काजलने दोघांचेही अनेक फोटो शेअरही केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER