कायझेन : एक व्यवस्थापन तंत्र

A management technique

कारखान्यातील उत्पादन असो, ती कालच्या लेखात सांगितल्याप्रमाणे स्मार्ट गृहिणी बनायचं असो, नाहीतर अगदी आपल्या धकाधकीच्या जीवनात स्त्री-पुरुष प्रत्येकालाच घर आणि काम दोन्हीची कसरत करायची असो .आपल्याला निश्चितपणे मदत करणारे हे एक तंत्र ! यामध्ये मग आपण स्वतः, आपला परिसर, आपले समाजजीवन ,नातेसंबंध एवढेच काय अगदी घराचं व्यवस्थापन सुद्धा व्यवस्थित होण्यासाठी मदत होते .कुठलेही काम चांगलं होण्यासाठी त्या कामावर श्रद्धा आणि त्या कामासाठी भरपूर मेहनत घेण्याची तयारी या तर गोष्टी आवश्यकच आहेत. पण कुठल्याही कामात परिपूर्णता येण्यासाठी आणि असं असूनही ते काम हे सुखद होण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता निश्चित म्हणे असते आणि त्याला उत्तर म्हणजे कायझेन ही प्रणाली .

जपानी कंपन्या वर्षानुवर्ष आपल्या उत्पादनामुळे आणि विक्री नंतरची सेवा यासाठी वाखाणल्या जातात .उत्पादनाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी या सर्वांनी कायझेन नावाचे तंत्रज्ञान यशस्वीरीत्या प्रयोगात आणलेले आहे .”कायझेन” म्हणजे छोटे-छोटे सातत्याने केलेले चांगले बदल की ज्यातून मोठी ध्येये गाठावे येणे शक्य होते, हा या विचारसरणीचा पाया आहे. त्यात KAI म्हणजे सुधारणा करणे किंवा त्या दृष्टीने योग्य तो बदल करणे ZEN म्हणजे असे करण्यासाठी विचारपूर्वक प्रयत्न करणे ,ज्यामधून जास्तीत जास्त चांगलं घडेल. म्हणजेच KAI ZEN म्हणजे त्याचा पूर्णपणे अभ्यास करून साध्या सोप्या पद्धतीने कामाचा दर्जा सुधारणे.

कायझेन चार प्रकारे उपयोगात आणले जाते.

१) 3M म्हणजे MUDA , MURA ,आणि MURI. म्हणजे थोडक्यात एखाद्या प्रक्रियेत येणारे अडथळे व अनावश्यक गोष्टी, आणि एखाद्या प्रक्रियेतील अनिश्चितता किंवा चढ- उतार .उत्पादनात कमीत कमी कचरा निर्माण करण्याचे तोडगे शोधून वातावरण व तंत्रज्ञान निर्माण करणे. आणि उत्पादन प्रक्रियेतील जोखीम कमी होऊन होऊन मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जपले जाण्याकरता लक्ष पुरवणे. यातून एकाच प्रकारची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी मदत होते .चढ-उतार थांबतात.

2) 5W व्होट? व्हाय? व्हेन? व्हेअर? हु? हे प्रश्न विचारून सुधारणा करणे .म्हणजे नक्की प्रॉब्लेम काय आहे आणि त्यासाठी नक्की काय करायला हवं, त्याचबरोबर चांगलं वाईट जे घडलं त्याचा घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून एकूण एखादी घटना योग्य वेळी, योग्य जागी, योग्य व माणसा द्वारे न केली गेल्याने प्रॉब्लेम झाला का हे सिद्ध केलं जातं .

3) 5 S ( याविषयी,” 5 S हाउसकीपिंग साठी नव्हे तर होम कीपिंग साठी.) या विषयांवर चर्चा करणारा माझा लेख यापूर्वी येथेच तुमच्या साठी दिलेला होता. त्यामुळे परत सविस्तर त्या विषयात जात ना.

काय आहे हे “कायझेन तत्व” ? तर हा एक जपानी शब्द आहे .त्याचा अर्थ असा की “कंटीन्यूअस इम्प्रोवमेंट विथ स्मॉल चेंजेस” म्हणजेच अधिक चांगल्यासाठी सातत्याने छोटे छोटे बदल वा सुधारणा करणे यात दोन्ही घटकांना तेवढेच महत्त्व आहे. यातला एक जरी घटक नसेल तरी त्याला कायझेन म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ मला वजन कमी करायचे आहे हे ठरवणे हा पहिला घटक आणि त्यासाठी सातत्याने थोडे थोडे प्रयत्न करत राहणे हा दुसरा. साकीची टोयोडा हे या तत्वाचे मूळ प्रणेते. त्यांच्या तोयोडा कंपनीतही ही सगळी तत्त्वे वापरली जात होतीच .नियोजन ,दूरदृष्टी वगैरे .

पण इतर कंपन्यांपेक्षा त्यांच्या कंपनीत एक महत्त्वाचा फरक होता तो म्हणजे चाकोरी पेक्षा वेगळ्या नजरेनं या प्रत्येक घटकाकडे पाहणं. त्यांनी आपल्या सहकार्या समोर एक विचार मांडला,”ओपन द विंडो, इट इज द बिग वर्ल्ड आऊट देअर.”या नव्या दृष्टीने प्रत्येकाने दर्जा कार्यालयीन संस्कृती सुरक्षितता आणि इतर गोष्टींकडे पाहिला सुरुवात केली आणि परिणाम, मालाची त्वरित पोच, कमी उत्पादन खर्च उत्तम सांघीक काम यासारखे फरक पडले.

मसाकी इमाई यांनी 1986 मध्ये ही संकल्पना जगापुढे मांडली. तोयोडा यांच्या विचारांना तत्त्वज्ञानाची बैठक दिली आणि कायझेन हा यशासाठी ची गुरुकिल्ली असलेला शब्द ठरला .आपण करू त्या कामात उत्तम दर्जा गाठायचा असेल तर त्या कामात दररोज छोटी-छोटी सुधारणा करत जाणे हा विचार मांडताना पाश्चिमात्य विचार आणि कायझेन विचार यातला फरक त्यांनी समजावून सांगितला,”आधी करा ते अधिक चांगलं करा. त्यात सुधारणा करा नाहीतर स्पर्धेत टिकू शकणार नाही .आपल्याला जर आपले स्थान मिळवायचं असेल तर दररोज आपण करत असलेल्या गोष्टींमध्ये छोट्या-छोट्या सुधारणा करत या यशाच्या उच्च पातळीवर पोहोचणे म्हणजे कायझेन. सुधारणा करायच्या पण बेबी स्टेप्स च्या आधारे.

एकावेळी एकाच विचारावर लक्ष केंद्रित करायचे. एका वेळी एकाच मुद्द्यावर कृती करायची. एकावेळी एकाच छोट्या अडचणीवर मात करायची. एकावेळी छोट्या कशाचाही आनंद म्हणून मनोबल वाढवायचे. समजा कंपनीत मालाचा खप वाढवायचा आहे. तर काय काय करायला लागेल? सेल्स स्कीम नव्या आणावे लागतील. वितरकांचे जाळे निर्माण करावी लागेल. कुशल असे सेल्समन निर्माण करावे लागतील. डेमिंगच्या सिद्धांतानुसार कायझेन मध्ये plan – do – check – action असे चक्र असते. आपण हे व्यवस्थापन तंत्र अनेक गोष्टींना लागू करू शकतो. @ मला माझं काहीतरी अस्तित्व असावं म्हणून काहीतरी करायच आहे. पण काहीतरी म्हणजे काय ? हा प्रश्न अनेक स्त्रियांना पडतो. बरीचशी वर्ष ही घर सांभाळणे मुलं-बाळं यात गेलेली असतात. आणि अशा अर्धवट वयात काय करायचं हा प्रश्न त्यांना पडतो.

  • त्यावेळी मला माझ्यात नेमके कोणते बदल पाहिजे?
  • माझ्यातले गुण कोणते?
  • मी कोण कोणत्या गोष्टी चांगल्या करू शकते?
  • माझे दोष कुठले ?
  • जर मला लहान मुलांसाठी काम करायचे असेल तर ती मुले माझ्याकडे येतील कशी ?

@ घराच व्यवस्थापन करायचं आहे . मग यात स्वयंपाक घराचा नियोजन, कपड्यांचा नियोजन, स्वच्छतेचे नियोजन, कागदपत्रांचे नियोजन ,खरेदीचे नियोजन, एखाद्या पार्टी चे नियोजन, सणसमारंभाचे नियोजन , ताई पाहुणे येणार असतील त्याचे नियोजन, आर्थिक गोष्टीचे नियोजन, अहो एवढच काय काय माझ्या स्वतःच्या भावनांचे नियोजन करण्यासाठीसुद्धा मला बेबी स्टेप्स उपयोगात येतात. फ्रेंड्स कुठेही उपयोगात येणारी कायझेन पद्धती नक्की वापरून बघा.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER