इचलकरंजीमुळे कागलकरांना पाणी कमी पडणार नाही : खा. धैर्यशील माने

Dhairyasheel Sambhajirao Mane

कोल्हापूर : इचलकरंजी शहराला पिण्यासाठी 50 एम एल डी पाणी काळम्मावाडी धरणाच्या दुधगंगा नदीतून उपसा करण्यात येणार आहे. धरणात असून सुमारे 75 एम एल डी पाणीसाठा शिल्लक राहणार आहे, त्यामुळे कागलकरांना पाणी कमी पडणार नाही अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी मंगळवारी दिली.

31 जुलै पर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा अहवालही शासनाकडे पोहोच केला जाईल. अंतिम निर्णय पालकमंत्री सतेज पाटील सर्व मंत्री, खसाद आमदार, लोकप्रतिनिधी यांना सोबत घेऊनच होईल असा विश्वास खासदार धैर्यशील माने यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. इचलकरंजीतील नगराध्यक्ष अलका स्वामी इतर, पदाधिकारी, नगरसेवक यांच्यासह जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची चर्चा करून सविस्तर वस्तुनिष्ठ माहिती घेतली. कोल्हापुरातील शासकीय विश्रामधाममध्ये बैठक झाली.

राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी धरणातून दुधगंगा नदीत पाणी सोडले जाते. या धरणातील उपयुक्त पाणीसाठा २३.९९ टी.एम.सी आहे. पाठबंधारे विभागाकडून पिण्यासाठी म्हणून ५. ९५ टीएमसी पाणी साठा आरक्षित ठेवण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रत्यक्ष वापर ३. ७१० टीएमसी आहे. तरीही पिण्याचे १.१४ टीएमसी पाणी सध्या धरणात शिल्लक आहे. याच आरक्षित पिण्याच्या पाण्याच्या कोट्यातून हे पाणी सुळकूड येथे बंधारा बांधून, येथून उपसा करून इचलकरंजीला देता येणं शक्य आहे. यामुळे शिरोळ आणि कागल या दोन्ही तालुक्यातील पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित राजे घाटगे यांनी दूधगंगा नदीचे पाणी हे आमच्या हक्काचे आहे. असे म्हणत या योजनेला विरोध दर्शवला आहे. मात्र सध्या इचलकरंजी परिषदेत हि भाजपची सत्ता आहे. त्यामुळे राजकीय विरोध होऊ नये. यासाठी, आम्ही सर्व शासकीय आकडेवारी घेऊन, समरजित राजेना भेटणार आहोत. त्यांना सर्व वस्तुस्थिती पटवून सागू. त्यामुळे त्यांचा विरोध नक्कीच मावळे. त्यामुळे हि योजनेच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, असा विश्वास इचलकरंजीच्या नगराध्यक्ष अलका स्वामी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER