कदीर मौलानासह दोघांना अटक व सुटका

Qadir Maulana

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील व मध्यचे उमेदवार कदीर मौलाना यांच्यात झालेली बाचाबाची व धक्काबुक्की प्रकरणानंतर नगरसेवक अज्जू पहिलवान, कदीर मौलाना व त्यांचा मुलगा ओसामा कदीर याला जिन्सी पोलिसांनी सोमवारी (ता. २१) रात्री उशिरापर्यंत अटक केली. त्यानंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली.

ही बातमी पण वाचा : कॉपर वायर चोरणारे अटकेत

अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कदीर मौलाना व खासदार इम्तियाज जलील यांच्यात सोमवारी सायंकाळी बाचाबाची व धक्काबुक्की झाली. हा प्रकार कटकट गेट भागात घडला. त्यानंतर एमआयएम कार्यकर्त्यांचा जमाव कदीर मौलाना यांच्या घरावर चालून गेला होता. परंतु पोलिसांची कुमक तेथे असल्याने कार्यकर्त्यांना त्यांनी हुसकावून लावले.

यांनतर हाच जमाव जिन्सी पोलीस ठाण्यासमोर आला होता. यानंतर खबरदारी म्हणून मध्यचे उमेदवार कदीर मौलाना व खासदार इम्तियाज जलील यांच्या घराभोवती सुरक्षा वाढवण्यात आली. रात्री उशिरा या प्रकरणी एमआयएमतर्फे इमरान अब्दुल अजीज कादरी यांनी तक्रार दिली. त्यानुसार कदीर मौलाना, नगरसेवक अज्जू पहिलवान, ओसामा तसेच कदीर मौलाना यांचा भाऊ यांच्यासह १०-१२ जणांविरुद्ध जिन्सी पोलीस ठाण्यात दंगलीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर अटक करून त्यांची सुटका करण्यात आली.