शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Kabir Singh

मुंबई :- शाहिद कपूरच्या बहुचर्चित ‘कबीर सिंह’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. या चित्रपटातील शाहिदचा ‘अँग्री यंग मॅन’ लुक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे . ट्रेलरच्या सुरुवातीलाच कबीर सिंहचा हा विक्षिप्तपणा आपल्या लक्षात येतो. चित्रपटातील हा कबीर सिंह हट्टी आहे, प्रचंड रागीट आहे आणि बंडखोर आहे. वैद्यकीय महाविद्यात शिकणाऱ्या , प्रीती नावाच्या मुलीच्या प्रेमात पडणाऱ्या आणि आयुष्यातून प्रेम निघून गेल्यावर तिच्या आठवणीत स्वत:ला त्रास करून घेणाऱ्या कबीर सिंहच्या आयुष्याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

शाहिदचा हा चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे . या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केलं होतं. रिमेकचं दिग्दर्शनही संदीप वांगा करत आहेत. या चित्रपटात शाहिद कपूरसोबत कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २१ जूनला प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे .