जुवेकरांची वॉटर थेरपी

Santosh Juvekar

कोरोनामुळे (Corona) अजूनही काही कलाकार हे घरात आहेत पण काही कलाकार हे हा वेळ देखील खूप छान पध्दतीने अनुभवतात आणि त्यातच सुख मानून घरात सुरक्षित राहतात.आता जरी अनलॉक झालं असली तरी आपल्यावरील काही बंधन ही थोड्या फार प्रमाणात कमी झाली आहेत. घरी बसून अनेक कलाकारांनी आपलं मनोरंजन देखील केलं कलाकार हे त्यांच्या सोशल मीडियावरून आपल्या भेट येत राहतात. नुकताच एका अभिनेत्या ने एक खास विडिओ त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत तो साध्य एक अनोखी थेरिपी घेत असल्यास सांगितलं. आता तुम्हाला वाटेल ही काहीतरी सिरीयस वगैरे थेरिपी आहे तर असं काही नसून ही खास थेरिपी नक्की काय आहे बघूया.

हिंदी , मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाची वेगळीच ओळख असलेला अभिनेता ” संतोष जुवेकर ” (Santosh Juvekar) सध्या एका वेगळ्याच थेरिपी मध्ये मग्न झाला आहे , ही त्यांची खास काय थेरिपी आहे हे त्यांच्या सोशल मीडियावरच्या एका व्हिडिओ मधून समोर आलं. संतोष सध्या ” रिव्हर वॉटर थेरिपी ” घेण्यात रमला आहे. संतोषने त्यांच्या सोशल मीडियावर एक खास विडिओ शेयर करत त्याला भन्नाट कॅप्शन दिलंय तो असं म्हणतो ” निवांत नदीच्या काठाला वाहत्या पाण्यात पाय बुडवून बसलं की लय भारी वाटतंय राव म्हणजे कितीबी नाव , पैसा कमावला किंवा ३ करोडच घर असुदे नाहीतर १० करोडच फार्महाऊस असुदेत ५० लाखांची गाडी असुदे च्यायला सगळं झक मारतय ह्या असली खऱ्या आनंदा पुढं , ह्याला एक नाव दिलंय मी रिव्हर वॉटर थेरिपी ” खरंतर एवढं मनमोकळेपणाने जगण्यात काय आनंद आहे हे त्यांच्या बोलण्यावरून कळतंय.

आपल्याला प्रत्येकाला आयुष्यात सुख , संपत्ती , गाडी एवढं असलं तरी आपण आपल्याला सुखी मानतो पण या अश्या छोट्या छोट्या गोष्टी जगून त्यात आनंद अनुभवायला शिकता आलं पाहिजे. संतोष जुवेकर ची ही आनंदाची व्याख्या मनाला एकदम पटणारी आहे. आपल्याला निसर्गाने एवढं कमालीचं वरदान दिलंय ते कधीतरी मुक्तहस्त पणे अनुभवता आलं पाहिजे बस्स अजून काय हवंय. नेटफ्लिक्स आणि बाकी सोशल मीडिया मधून डोकं वर काढून कधीतरी लांब कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन तिथला निसर्ग मनमोकळे पणाने जगात आला पाहिजे. आयुष्यातले हे अगदी छोटे सहज सुंदर अनुभव घेण्यात एक वेगळीच मजा आहे असं तो सांगतो.

आपल्या प्रत्येकाच्या सुखाच्या परिभाषा या अनोख्या असतात परंतु या परिभाषा जपल्या आल्या पाहिजेत आजूबाजूच्या छोट्या छोट्या गोष्टी मधलं समाधान अनुभवता आलं पाहिजे. आनंद हा फक्त पैशाने मिळत नसतो तर कधीतरी छोट्या गोष्टी मधला आनंद हा पैशा पेक्षा लाख पटीने मोठा असतो. मराठी सिनेमा आणि मालिका विश्वात आज संतोष जुवेकर च अनोखं स्थान आहे पण त्यांची सुखाची व्याख्या काही औरच आहे. त्याने आपला खरा आनंद जपण्याचा प्रयन्त केलाय आणि आपल्याला हा आनंद अनुभवण्यासाठी प्रेरीत केलयं. संतोष ने एकदम गावरान ठसकेदार भाषेत हा आनंद लिहून त्याचं सुख नक्की काय आहे हे आपल्याला दाखवून दिलंय.

नेहमीच शूट्स आणि बाकी कामात व्यग्र असताना कधीतरी कलाकारांना त्यांचा असा हा मी टाइम अनुभवयाला मिळतो. काही कलाकार त्यांच्या कामातून हा आनंद वारंवार अनुभवत असतात पण सुट्टीच्या दिवशी किंवा कधीतरी कुठेतरी लांब फिरायला जावं निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आपला हा फ्री टाइम अनुभवावा आणि त्यात काय तो मनसोक्त आनंद अनुभवावा हे फार क्वचित लोकांना जमत आणि ते संतोष ने करून दाखवलंय. नेहमीच मालिका , चित्रपटाच्या शूट कामात व्यस्त असणारा संतोष त्यांचा मोकळा वेळ छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेण्यात मस्त घालवतो. कधीतरी होणारी लॉंग ड्राईव्ह तर कधीतरी ही रिव्हर वॉटर थेरिपी !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER