न्यायमूर्ती रणजित मोरे यांची मेघालय उच्च न्यायालयात बदलीची शिफारस

ranjit-more-recommends-transfer-to-meghalaya-high-court

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयातील सेवाज्येष्ठतेनुसार मुख्य न्यायमूर्तीनंतरचे तिसऱ्या क्रमांकाचे न्यायमूर्ती रणजित मोरे यांची मेघालय उच्च न्यायालयात बदली करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने केली आहे.

न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले आहे. १९८३ मध्ये त्यांनी वकिलीला सुरुवात केली. २००६ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली.

न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी गेल्याच आठवड्यात तडकाफडकी राजीनामा दिला. वैयक्तिक कारणामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे न्या. मोरे हे सेवाज्येष्ठतेनुसार मुख्य न्यायमूर्तीनंतरचे तिसऱ्या क्रमाकांचे न्यायमूर्ती आहेत.

दुसऱ्या क्रमांकाचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी हे येत्या २७ एप्रिलला निवृत्त होत आहेत. न्यायमूर्ती मोरे यांची मेघालय न्यायालयात बदली करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने सरकारकडे केली आहे.

भारतीय वंशाचे श्रीनिवासन अमेरिकेत मुख्य न्यायाधीश नियुक्त