राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या कार्याध्यक्षपदी न्या. पी. सी. पंत

Justice Prafulla Chandra Pant - National Human Rights Commission - Maharashtra Today
Justice Prafulla Chandra Pant - National Human Rights Commission - Maharashtra Today

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी न्या. प्रफुल्ल चंद्र पंत (Justice Prafulla Chandra Pant) यांची राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) निवृत्त न्यायाधीश असलेले न्या. पंत गेल्या दोन वर्षांपासून आयोगाचे सदस्य आहेत. आयोगाचे अध्यक्ष व निवृत्त सरन्यायाधीश न्या. एच. एल. दत्तु गेल्या २ डिसेँबरला निवृत्त झाले. त्यांच्या जागी नवे पूर्णवेळ अध्यक्ष नेमेपर्यंत न्या. पंत आयोगाचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतील.

आता आयोगावर कार्याध्यक्ष न्या. पंत यांच्याखेरीज ज्योतिका कालरा व डॉ. ज्ञानेश्वर मनोहर मुळे हे दोन सदस्य आहेत.  अध्यक्षांची व दोन सदस्यांची पदे रिक्त आहेत. माजी सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यांना अध्यक्ष नेमले जाऊ शकते. त्यामुळे कार्याध्यक्ष झालेले न्या. पंत हेही पूर्णवेळ अध्यक्ष होऊ शकतात.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button