हिमा कोहली तेलंगणच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश

Justice Hima Kohli is the first woman Chief Justice of Telangana

हैदराबाद :- हिमा कोहली (Hima Kohli) यांनी शुक्रवारी तेलंगण उच्च न्यायालयाच्या (Telangana High Court) मुख्य न्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतली. कोहली या तेलंगणच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आहेत. एवढेच नव्हे तर देशातील २५ उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांमध्येही त्या एकमेव महिला आहेत. याआधी हा मान न्या. गीता मित्तल यांच्याकडे होता. परंतु त्या काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदावरून निवृत्त झाल्या.

राजभवनात झालेल्या साध्या समारंभात राज्यपाल डॉ. श्रीमती तमिलसाई सौंदरराजन यांनी न्या. कोहली यांना पदाची शपथ दिली. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, उपमुख्यमंत्री मेहमूद अली यांच्यासह मंत्री, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व वरिष्ठ अधिकारी  समारंभाला हजर होते.

कोहली गेली १४ वर्षे दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश होत्या. ‘कॉलेजियम’ने केलेल्या शिफारशीनुसार ३० डिसेंबर रोजी राष्ट्रपतींनी त्यांची तेलंगणात मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक केली. तेलंगणचे आधीचे मुख्य न्यायाधीश राघवेंद्र सिंग चौहान यांची उत्तराखंड उच्च न्यायालयात त्याच पदावर बदली झाल्याने त्यांच्या जागी न्या. कोहली यांना नेमण्यात आले आहे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER